वैद्यकीय सेवा

 

पुज्यश्री बाबाजींनां सेवाकार्याची अतिशय आवड असल्यामुळे मंदिरातच वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आली आहे . येथे प्रत्येक गुरुवारी डॉक्टर बोलवले जातात , भाविकांची मोफत तपासणी केली जाते व औषदेही मोफतच पुरवली जातात, संस्थानामध्ये आयुर्वेदीक,होमिओपॅथी, ऍलोपॅथी अशा सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा भक्तांसाठी उपलब्द करून दिल्या जातात . शिवाय वेळोवेळी शिबीर घेतले जातात, येथे आत्तापर्यंत डोळे चिकित्सा शिबीर, मधुमेह चिकित्सा शिबीर,दन्त चिकित्सा शिबीर , आरोग्य चिकित्सा शिबीर असे वेळो वेळी मंदिरात राबवले जातात . पुज्यश्रींचे हृदय त्यांच्या भक्तांसाठीच नव्हे तर सीमेवरच्या जवानांसाठी सुध्दा तितकेच हळहळते म्हणूनच बाबाजींनी हजारो बाटल्या रक्त दान करण्याचा संकल्प घेतला आहे व त्यानुसार वेळोवेळी रक्तदान शिबीर मंदिरामध्ये राबवले जाते .