सेवाकार्य

 

श्री दत्तमंदिर संस्थान श्रीक्षेत्र रुईभर स्थानातील मोफत सेवाकार्य

मोफत अन्नछत्र सेवा :-

श्री दत्तमंदिर संस्थान श्रीक्षेत्र रुईभर येथे श्री दत्तमहाराजांच्या कृपेने व पुज्याश्रींच्या प्रेरणेतून २४ तास अखंड मोफत अन्नछत्र सुरु आहे. स्थानात येणाऱ्या सर्व जाती-धर्मातील कोणीही भाविक जेवल्याशिवाय जाऊ द्यायचा नाही असा पुज्याश्रींचा प्रेमळ दंडक आहे.भाविकही मोठ्या प्रेमाने व प्रसादाच्या भावनेतून या अन्नछत्रात प्रसादाचा लाभ घेत आहेत.

मोफत वैद्यकीय सेवा :-

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा, समाजच्या सामाजिक स्वस्थ्याबरोबरच शारीरिक स्वास्थ्यही उत्तम असणे गरजेचे आहे, या भावनेतून, पुज्याश्रींच्या प्रेरणेतून स्थानात मोफत दवाखाना चालविला जातो. सेवाभावी तज्ञ डॉक्टर, वैद्य आयुर्वेदिक तसेच इतर उपचार रुग्णांवर पुर्णतः मोफत औषधोपचार देऊन करतात. योगासनाचे मोफत शिबिरही घेतले जातात.

मोफत रुग्णवाहिका सेवा :-

ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत या भावनेतून परिसरातील सर्व नागरिकांना स्थानाकडून मोफत रुग्णवाहिका सेवा पुरविली जाते.

रक्तदान शिबीर :-

प्रत्येक गुरू पौर्णिमेला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. या निमित्यानी राष्ट्रासेवा करण्याचे पूर्ण प्रयंत्न करण्यात येते. या मध्ये सर्व भक्तांचे पूर्ण योगदान असते

गौशाला :-

गोशाले मध्ये गाइंची सेवा करण्यात येते. मंदिराने आपल्या आवारामध्ये गोशाला उभारली आहे, जेणे करून गाइना पूजेचे नेवेध्य देण्यात येईल व पूजा पूर्णत्वास येईल