श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे धाराशिव (उस्मानाबाद) पासुन ८ कि.मी. अंतरावरील एक छोटेसे पण टुमदार गाव. प.पू . सद्गुरू आप्पा बाबांचे रुईभर हे छोटेसे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रातील दत्त उपासकांचे आशेचे , श्रद्धेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. श्रीक्षेत्र रुईभर येथे श्री दत्त मंदिर संस्थान या नावाने न्यास नोंदणीकृत असून आज पुज्यश्री या ठिकाणावर सन १९८३ पासून आहेत. या ठिकाणातून समाजातील अठरा पगड जाती धर्मांतील लोकांना , तरुण पिढीला धर्मकार्याची , राष्ट्रकार्याची व समाजसेवेची शिकवण अखंडपणे पुज्याश्री देत आहेत.
आठवडा भर समाजप्रबोधनाच्या कार्यात पुज्यश्री भारतभरात कोठेही असले तरी प्रत्येक गुरुवारी ते श्रीक्षेत्र रुईभर येथिल श्री दत्त मंदिर संस्थानात असतात. निरनिराळ्या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने प्रत्येक गुरुवारी पुज्यश्रींच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र रुईभर येथे श्री दत्त मंदिर स्थानात येतात.
श्री दत्तमहाराजांच्या कृपेने व पूज्यश्रींना झालेल्या प्रेरणेतून श्रीक्षेत्र रुईभर येथे श्री दत्तमहाराजांचे अति भव्य व अतिशय सुंदर मंदिर साकारात आहे. श्री दत्तमंदिराचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाशानातील असून त्यावर अतिशय नाजूक कोरीव कलाकुसर आहे . मंदिराचे भव्य सभागृह १०५ x ७० चौ. फुटांचे असून , गर्भगृह ५ मी. x ५ मी. आकाराचे आहे.गर्भागृहाबाहेरील प्रदक्षिणेचा मार्ग ४५ x ५० चौ.फुटांचा असून गर्भागृहावरील संपूर्ण शिखर राजस्थानातून मागविलेल्या डोलपुरी (लाल) दगडात अतिशय कोरीव रेखीव तयार होत असून शिखराची उंची ५१ फुटाचे आहे. भाविकांकडून श्री दत्तमहाराजांच्या चरणी अर्पण होत असलेल्या स्वेच्छा - सेवेतून अल्पावधीतच श्री दत्त मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण होत आहे.
मंदिरात येणाऱ्या भाविकांना जप, तप, साधना, ध्यानधारणा करण्यासाठी २७ x ९ चौरसफुटांचे ध्यान मंदिर आहे. मंदिरात १६० x ५५ चौरस फुटांचे बहुउद्देशीय सभागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी ५५ x ६० चौरसफुटांचे " भक्त निवास " भाविकांच्या सेवेत सुसज्ज झालेला असून या " भक्त निवासाचे " नियोजित बांधकाम ५ मजल्यांचे आहे.
मंदिर
-
दत्त महाराज
दत्त महाराज यांची विलोभनीय मूर्ती;
-
आप्पा बाबा
आप्पा बाबा प्रवचन करताना
-
नियोजित मंदिर
नियोजित मंदिर असे असेल
-
मंदिरातील रोषणाई
मंदिराच्या गाभार्यातील रोषणाई
-
कोजागिरी पोर्णिमा
कोजागिरी पोर्णिमा उत्साहात अर्पण होते
-
पालखी
मंदिरामध्ये पालखी सोहळामधील एक टिपलेले छायाचीत्र
-
बाबाजी
गुरू पोर्णिमाच्या वेळेश बाबाजीना स्नान घालतेवेळेस भक्तजन
-
मिरवणूक
गुरू पोर्मिमेतील उत्साहात मिरवणूक साजरी होताना