अन्नछत्र

 

दत्त याग

मोफत अन्नछत्र सेवा :-

 

श्री दत्तमंदिर संस्थान श्रीक्षेत्र रुईभर येथे श्री दत्तमहाराजांच्या कृपेने व पुज्याश्रींच्या प्रेरणेतून २४ तास अखंड मोफत अन्नछत्र सुरु आहे. स्थानात येणाऱ्या सर्व जाती-धर्मातील कोणीही भाविक जेवल्याशिवाय जाऊ द्यायचा नाही असा पुज्याश्रींचा प्रेमळ दंडक आहे.भाविकही मोठ्या प्रेमाने व प्रसादाच्या भावनेतून या अन्नछत्रात प्रसादाचा लाभ घेत आहेत.

अनेक भक्त येथील प्रसाद घेऊन तृप्त होतात,मंदिरातील मादोकरीला जी चव आहे त्याचे शब्दात वर्णन शक्यच नाही ते फक्त अनुभवानेच कळू शकते . तसेच अनेक भक्त इथे अन्नदान करून पुण्यही कमावतात,या रुईभर भूमीवर जो आनंद घेण्यात आहे त्याही पेक्षा जास्त आनंद तेथे जाऊन राहण्यात व सेवेत आहे. आज पर्यंत पुज्यश्रींनी एकही भक्त मंदिरातून उपाशी जाऊ दिला नाही . प्रत्येक भक्ताला ते स्वतः चौकशी करतात व प्रसाद घेतल्या शिवाय जायचं नाही असं प्रेमाने बजावतात . पुज्यश्रींच्या पंगतीची गम्मत तर वेगळीच आहे , बाबा स्वतः सर्वांना हाताला येतील तशा पोळ्या वाढतात मग त्या दोन असतील,चार असतील किंवा जास्त असतील त्या आईच्या प्रेमाने भक्तांना वाढतात व भक्त त्या सर्व सम्पवतात आणि प्रत्येक भक्त येथील प्रसाद घेऊन तृप्त होतो.