भक्त निवास

 

श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर येथे भक्तांची वाढती अलोट गर्दी पाहून पुज्यश्रींना आनंद तर व्हायचा पण भक्ताची गैरसोय पाहून त्यांना खूप दुःख व्हायचे, आणि त्यामुळेच पुज्यश्रींनी भक्तनिवासच्या निर्मितेचा निर्णय घेतला. आज मंदिराच्या आवरामध्ये ही भक्तनिवासाची भव्य इमारत सुसज्ज उभी आहे . संस्थानाकडून ही भक्तासाठी विनामूल्य सोय पुज्यश्रींनी केली आहे. या भक्त निवासामध्ये दोन मोठे मोठे हॉल व चाळीस रूम्स बाथरूमसहीत व सर्व प्रार्थमिक गरजेच्या वस्तू सहित तयार कारन्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून सोलरचा वापर भक्तनिवासामध्ये केलेला आहे. येथे भाविकांकडून कुठलाही मोबदला न घेता राहण्याची सोय संस्थांना मार्फत केली जाते. अनेक धर्मगुरू मंदिराला भेट देत असतात, त्यासाठीच पुज्यश्रींनी वेगळी इमारत उभारली आहे .तेथेही दोन मोठे मोठे हॉल व धर्म गुरूंसाठी वैयक्तिक रूम्स, वैयक्तिक स्वयंपाक खोली अशी इमारतींची उभारणी करण्यात आली आहे .