मंदिर देणगी

 

श्री दत्तमहाराजांच्या कृपेने व पूज्यश्रींना झालेल्या प्रेरणेतून श्रीक्षेत्र रुईभर येथे श्री दत्तमहाराजांचे अति भव्य व अतिशय सुंदर मंदिर सकारात आहे. श्री दत्तमंदिराचे संपूर्ण बांधकाम काळ्या पशानातील असून त्यावर अतिशय नाजूक कोरीव कलाकुसर आहे . मंदिराचे भव्य सभागृह १०५ x ७० चौ. फुटांचे असून , गर्भगृह ५ मी. x ५ मी. आकाराचे आहे.गर्भागृहाबाहेरील प्रदक्षिणेचा मार्ग ४५ x ५० चौ.फुटांचा असून गर्भागृहावरील संपूर्ण शिखर राजस्थानातून मागविलेल्या डोलपुरी (लाल) दगडात अतिशय कोरीव रेखीव तयार होत असून शिखराची उंची ५१ फुटाचे आहे. भाविकांकडून श्री दत्तमहाराजांच्या चरणी अर्पण होत असलेल्या स्वेच्छा - सेवेतून अल्पावधीतच श्री दत्त मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण होत आहे.

मंदिरात येणाऱ्या भाविकांना जप, तप, साधना, ध्यानधारणा करण्यासाठी २७ x ९ चौरसफुटांचे ध्यान मंदिर आहे. मंदिरात १६० x ५५ चौरस फुटांचे बहुउद्देशीय सभागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी ५५ x ६० चौरसफुटांचे " भक्त निवास " भाविकांच्या सेवेत सुसज्ज झालेला असून या " भक्त निवासाचे " नियोजित बांधकाम ५ मजल्यांचे आहे.

आपणही मंदिरास देणगी देऊन मंदिराच्या उभारणीमध्ये मदत करू शकता,

मंदिर देणगी संपर्क

श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर, ता .जी .धाराशिव(उस्मानाबाद), महाराष्ट्र.
संदीप काळे - ९४०४९९१६३८,
अनिल मंगरुळे सर - ९४२२०७०३१३, ९४२२०७०९००