ब्लॉग डिटेल्स


।। दास-वाणी ।।


।। दास-वाणी ।। आता श्रवण कैसें करावे । तेंहि सांगिजेल अवघें । श्रोता अवधान द्यावें । येकचित्ते ।। तें वगतृत्व त्यागावें । जे माईक स्वभावें । जेथे निश्चयाच्या नावें । सुन्याकार ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०९/०१-०३ श्रवणाचे महत्व सांगितले आता ते कोणते, कसे, कधी करावे तेही विस्ताराने सांगतो. श्रोत्यांनी एकाग्रचित्ताने लक्ष द्यावे. मायिक म्हणजे मायेपासून निर्माण झालेल्या पंचमहाभौतिक दृश्य सृष्टीचेच रसभरीत वर्णन जे आपल्या मनाला सुखावते, लालचावते आणि गुंतवून ठेवते असे श्रवण शक्यतो टाळावे. अशा फसव्या रंगीबेरंगी शाब्दिक भूलभुलैया श्रवणाने साधकाने केलेला ब्रह्मप्राप्तीचा निश्चय कधीच तडीला जात नाही. भक्ताचा परमार्थ शून्य होतो तर फक्त प्रापंचिक ओढ वाढते. मायिक श्रवण टाळून अद्वैत ग्रंथांचाच आधार घेणे अधिक श्रेयस्कर. श्रवणनिरूपण समास.

Priya Kawhale