ब्लॉग डिटेल्स


।। दास-वाणी ।।


देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें । तेचि बोलणे स्वभावें । बोलिजेल ।। जेणे केले चराचर । केले सृष्टयादि व्यापार । सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०१/१६-१७ देव नेमके कोणाला म्हणावे ? त्याला कसे समजून घ्यावे ? ते मी आता बोलणार आहे. ज्याने ह्या सर्व चर अचर सृष्टीचे सृजन केले. जन्मापासून मृत्यूुपर्यंत जीवांचे व्यापार घडवून आणले.ही क्रिया अविरत सुरूच आहे. ‎निरंतर अस्तित्व असलेला हा सर्वकर्ता ‎ईश्वर किंवा देव या नावाने ओळखला जातो. ‎अखंड साधनेच्या मार्गाने त्या परब्रह्मापर्यंत ‎ पोहोचणे हे खरे देवशोधन होय. ‎ज्ञानदशक. ‎देवदर्शन समास.

Priya Kawhale