ब्लॉग डिटेल्स


कर्म हे श्रेष्ठ


एक शंकराच देऊळ होत. तिथे एक माणूस नियमीत दिवा लावायचा . त्याच वेळी एक नास्तिक माणूस तिथे येऊन तो दिवा नियमीत विझवून जायचा ! असे अनेक दिवस चालू होते . शेवटी जो आस्तिक होता तो कंटाळला व म्हणाला काय फायदा तो दिवा लावून मी लावतो आणि तो विझवतो ना त्याला शिक्षा होत ना मला फळ मिळत मग बंदच करतो दिवा लावणे ! पण नास्तिक मात्र त्या दिवशी दिवा विझवायचा नियम पाळण्यासाठी पोहोचतो अन शंकर भगवान प्रसन्न होतात . तो नास्तिक म्हणतो हे शिव शंकरा मी तर तू जगात आहे यावरच विश्वास ठेवत नव्हतो मग तू त्या दिवा लावणाऱ्याला प्रसन्न व्हायचेस तर मला कसा झालास ? यावर शंकरांनी उत्तर दिले मला सगळे सारखेच नास्तिक असो वा अास्तिक कारण मीच जीव निर्माण केले आहेत ! मी केवळ तुम्ही जे कर्म करता त्यावरूल निष्ठा बघतो ! तो आस्तिक होता पण तरीही तू दिवा विझवतो व फळ मिळत नाही म्हणून त्याने नियम मोडला परंतू तू तुझ्या कामासाठी अगदी वेळेत पोहोचलास त्यामुळे मी तुला प्रसन्न झालो ! कर्म हे श्रेष्ठ असते व नियमात राहून केले तर जास्त बळ प्राप्त होते . म्हणून नियम चुकवू नये व निष्ठा ठेवावी आपल्या कर्मांवर ! !! श्रीराम जय राम जय जय राम !!

Priya Kawhale