ब्लॉग डिटेल्स


गुरुभक्तीचा प्रसाद


सखाराम नावाचा एक व्यक्ती स्वामीभक्त होता. लग्नाचे नुकते पाच महिने झाले असता त्याचं निधन होतं. त्याच्या निधना नंतर त्याची पत्नी राधा पण त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे स्वामीभक्ती करायची. ती नऊ महिन्याची गरोदर असतांना सुद्धा तिचे थोरले दीर आणी जाऊ तिला फार छळायचे. ती दिवस भर काबाड-कष्ट करायची तरी तिला दोन वेळेचं अन्न ही महाग झालं होतं. एक दिवस तिची जाऊ तिला विहिरीवरून पाणी आणून हौद भरायला सांगते. राधेच्या तोंडात सकाळपासून अन्नाचा एक दाणा सुद्धा पडला नव्हता, तरी ती कशी-बशी पाणी आणायला जाते. तिकडे दीर आणी जाऊ वेगळ्याच कारणांनी चिंतीत असतात. कारण राधेला जर अपत्य झालं तर तो पंचायतच्या निकालामुळे निम्म्या संपतीचा मालक होणार होता. दीर-जाऊ निपुत्रिक होते, त्यांना धनंच आपलं आधार वाटत होतं.त्याचा अर्धा वाटा कुणाला देणं त्यांच्या जीवावर आलं होतं. विहिरीवर राधेला एक अनोळखी स्त्री भेटते, ती राधेला आपुलकीचे बोल बोलून आपली न्याहारी खायला देते, व स्वता तीचं पाणी भरत असते. योगायोगानी त्या स्त्री आणी राधेचं पातळ हुबे-हुब सारखं असतं. राधा आडोश्यात जाऊन न्याहरी करते. राधेचा कट काढू या बेतानी आलेली जाऊबाई राधेच्या भ्रमात त्या अनोळखी स्त्रीलाच विहिरीत ढकलते. घरी जाऊन ती नवऱ्याला आनंदानी सर्व वृतांत सांगते. आपली चिंता कायमची मिटली, असं मानुन ते निश्चिंत होतात. तितक्यात विहिरीवरून आलेल्या राधेला पाहून ते थबकतात. त्यांना हे कळतच नाही कि राधा विहिरीतुन जिवंत कशी परत आली. आणी विचारायाचे तर कशे, म्हणुन ते गप्प राहतात. पहिला बेत फसला म्हणुन जाऊबाई दुधात विष घालुन राधेला प्यायला देतात. विषामुळे राधा मृत अर्भकाला जन्म देते. राधेचा दीर मृत अर्भकाला मुठ माती द्यायला स्मशानात आणतो. तितक्यात स्वामी तिथे येतात, स्वामी राधेला आपली ओळख देतात. राधा त्यांना आपलं दुख सांगते, स्वामी कृपेनी अर्भक जीवंत होतं. तितक्यात एक श्वेत वस्त्र धारण केलेली, केस सोडलेली, भयंकर प्रतीत होणारी स्त्री तिथुन जातांना दिसते. स्वामी म्हणतात-"बये! रिकाम्या हाती कशाला जाते आहे!आली आहे तर कुणाला तरी घेऊ जा!" तितक्यात राधेच्या दिराला हृदय पीडा होऊन तो निधन पावतो. जाऊ बाई स्वामींची करुणा भाकते. स्वामी रागवतात:- " अरे! तु जीला विहिरीत ढकललं होत ते आम्हीच होतो!" " अरे एका छोट्या निष्पाप अर्भकाला मारण्य पर्यंत तुमची मजल गेली ?" " तेही फक्त धनाची वाटणी न होऊ म्हणुन!" "आता एकटी राहुन उपभोग कर धनाचा!". मग राधेला म्हणतात:-" मुली आम्ही तुझं सौभाग्य वाचवू शकलो नाही पण तुझं मातृत्व तुला परत करत आहो!" "जा नीट मोठं कर आपल्या पुत्राला." "आयुष्य भर आम्ही तुझ्या पाठीशी राहुन तुझं रक्षण करू."

Priya Kawhale