ब्लॉग डिटेल्स


।। दास-वाणी ।।


।। दास-वाणी ।। वस्तूसि जरी कल्पावें । तरी ते निर्विकल्प स्वभावें । तेथें कल्पनेच्या नावें । सुन्याकार ।। तथापि कल्पू जातां । न ये कल्पनेच्या हातां । वोळखी ठाई न पडे चित्ता । भ्रंश पडे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/०१-०२ वस्तू म्हणजे परब्रह्म. ते कसे आहे या विषयी कल्पना किंवा तर्क लढवता येत नाही कारण दोन्ही पूर्वानुभवावर आधारित आहेत.दृश्य आणि ज्ञानेंद्रियांना समजू शकणा-या गोष्टींच फक्त कल्पनेच्या आवाक्यात येतात. प्रत्यक्ष अनुभूती आल्यावर ते ब्रह्म शब्दातीत आहे हे लक्षात येते. तरीही त्याविषयी कल्पना करायचीच असे ठरवले तर ती थिटीच पडते. परब्रह्माची ओळख अपूरी झाल्याने चित्त किॆवा मन संभ्रमातच पडते. तेव्हा कल्पनेच्या जंजाळात न पडता श्रवण, मनन, नामस्मरण, योग आदी साधनामार्गाचा अवलंब करून ब्रह्मानुभूतीचा प्रयत्न करावा हे उत्तम.

Priya Kawhale