ब्लॉग डिटेल्स


गुरुआज्ञा


प्रार्थना या साठी करावी कारण सारं काही देवावर अवलंबुन आहे पण कार्य असे असावे की ते आपल्यावर अवलंबुन आहे. "राम कर्ता" ही भावना दृढ झाली की आपोआप निमित्तमात्रत्वाने कार्य पार पडते. कार्य का करावे? कोणासाठी करावे? कुठल्या हेतुने करावे? आणि कसे करावे? या प्रत्येक गोष्टीला फार महत्व असते. कार्य भगवंतासाठी करावे, अनेक जणांना आपल्या कार्याचा लाभ होईल असे कार्य करावे, निरपेक्ष बुद्धीने कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करावे, आणि नाम घेत घेत कार्य करावे जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य आपल्या कार्याने सतत काही ना काही बदल घडवुन आणण्य़ाचा प्रयत्न करतो असतो. आपला प्रयत्न असाच असावा की आपल्या कार्याने घडलेल्या बदलाने अधिक अधिक जणांना केवळ लाभच होईल. नित्य कार्य करणे अपरिहार्य आहे पण ते असे असावे जेणे करुन नेहमी सत्कार्यच घडेल !!श्री स्वामी समर्थ!! सारी सत्ता आहे "त्याचाच" हाती भजता "त्यालाच" ना कशाची भिती साक्षी ठेऊनी "त्यास" करावे कर्म घडेल "त्याच्या"मुळे सदा सत्कर्म.

Priya Kawhale